वावीकरांनी पाळला लॉकडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:24 IST2020-04-15T23:23:51+5:302020-04-15T23:24:15+5:30

कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र जनजीव न भयभीत झाले आहे. मात्र, असे असताना ग्रामस्थांकडून खबरदारी घेतली जात नसून बिनदिक्कतपणे आपले व्यवहार सुरू ठेवण्याला अनेकजण प्राधान्य देत आहेत. त्यामुळे विशेषाधिकाराचा वापर करून कोरोना प्रतिबंधक दक्षता समिती व ग्रामविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार बुधवारपासून (दि. १५) वावीकरांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाउन पाळण्यास प्रारंभ केला. भाजीपाला विक्रीसह किराणा दुकान बंद ठेवल्यामुळे वावी गावात शुकशुकाट दिसून आला.

Vavikar followed lockdown | वावीकरांनी पाळला लॉकडाउन

सिन्नर तालुक्यातील वावी येथे शंभर टक्के लॉकडाउन पाळण्यामुळे असलेला शुकशुकाट.

ठळक मुद्देखबरदारी : तीन दिवस किराणा, भाजीपाला बंद

सिन्नर : कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र जनजीव न भयभीत झाले आहे. मात्र, असे असताना ग्रामस्थांकडून खबरदारी घेतली जात नसून बिनदिक्कतपणे आपले व्यवहार सुरू ठेवण्याला अनेकजण प्राधान्य देत आहेत. त्यामुळे विशेषाधिकाराचा वापर करून कोरोना प्रतिबंधक दक्षता समिती व ग्रामविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार बुधवारपासून (दि. १५) वावीकरांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाउन पाळण्यास प्रारंभ केला. भाजीपाला विक्रीसह किराणा दुकान बंद ठेवल्यामुळे वावी गावात शुकशुकाट दिसून आला.
सकाळी साडेसात वाजेपर्यंत दूध संकलन केंद्रे बंद करण्यात आली. याशिवाय किराणा दुकाने, भाजीपाला विक्री, पीठ गिरणीदेखील बंद ठेवण्यात आल्या. केवळ आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवांशी निगडित आस्थापना सुरू ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांचेसह गावचे सरपंच नंदा गावडे, उपसरपंच सतीश भुतडा, माजी सरपंच विजय काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्यासह व्यापारी संघटना प्रतिनिधी यांनी शंभर टक्के लॉकडाउनसाठी परिश्रम घेतले.
वावी ग्रामपंचायतीने तीन दिवस १०० टक्के लॉकडाउन पाळण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोरोना दक्षता समितीने गावात येणारे सर्व अंतर्गत रस्ते बंद केले होते. गावात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर सुमारे ४० स्वयंसेवक खडा पहारा देत होते. प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जात होती. त्याचबरोबर गावातील कोणत्याही व्यक्तीला गावाबाहेर सोडले जात नव्हते. कोरोना दक्षता समितीचे अध्यक्ष विजय काटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४० स्वयंसेवक कार्यरत होते.

Web Title: Vavikar followed lockdown