दुर्गा महिला संस्थेचा वासंतिक उत्सव

By Admin | Updated: April 19, 2016 00:17 IST2016-04-19T00:03:00+5:302016-04-19T00:17:01+5:30

दुर्गा महिला संस्थेचा वासंतिक उत्सव

Vastantic festival of Durga Mahila Sangstha | दुर्गा महिला संस्थेचा वासंतिक उत्सव

दुर्गा महिला संस्थेचा वासंतिक उत्सव

 नाशिक : श्री दुर्गा महिला संस्थेचा वासंतिक उत्सव नुकताच साजरा झाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या. याप्रसंगी चैत्रगौरीचे पूजन व आरती करण्यात आली. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष हिरा कुलकर्णी यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष पुष्पा गोटखिंडीकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेत वर्षभरात झालेल्या स्पर्धांतील यशस्वी भगिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
उत्सवानिमित्त निनाद शुक्ल यांनी गीतरामायणातील काही गीते, पं. जसराज व पं. अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना व नाट्यगीते, भक्तिगीते गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले.
चैत्रगौरीची आरास करण्यासाठी अनुराधा कुलकर्णी, माणिक तांबे, मीरा पंडित, मृणालिनी साळवेकर यांनी सहकार्य केले. समारंभाला माजी आमदार निशिगंधा मोगल, मालती कुर्लेकर, सुमन बोरसे, कुमुद कुबल, वैशाली देवळे, पद्मा सोनी, सेजल चित्रे, माधुरी केळकर उपस्थित होत्या. सूत्रसंचालन मृणालिनी साळवेकर यांनी केले. वासंती बेंद्रे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)दुर्गा महिला संस्थेच्या वासंतिक उत्सवात चैत्रगौरीचे पूजन करताना अनुराधा कुलकर्णी, मृणालिनी साळवेकर, माणिक तांबे, वासंती बेंद्रे, माधुरी केळकर, वैदेही गायधनी, पद्मा सोनी, पुष्पा गोटखिंडीकर, हिरा कुलकर्णी.

Web Title: Vastantic festival of Durga Mahila Sangstha