शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

वसंतदादा पाटील विलक्षण दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व - मधुकर भावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:26 IST

स्व. वसंतदादा पाटील म्हणजे विलक्षण दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून त्यांनी त्याकाळी केलेले प्रयत्न लाखमोलाचे होते. अशी महाविद्यालये चालविण्यासाठी त्यांनी त्याकाळात रूढ केलेले आर्थिक गणित आज तंतोतंत लागू पडते. त्यातून त्यांचा सामाजिक व संवेदनशील दृष्टिकोन तर दिसून येतोच, पण भविष्याचा त्यांनी त्याकाळी घेतलेला आढावाही अधोरेखित होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.

नाशिक : स्व. वसंतदादा पाटील म्हणजे विलक्षण दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून त्यांनी त्याकाळी केलेले प्रयत्न लाखमोलाचे होते. अशी महाविद्यालये चालविण्यासाठी त्यांनी त्याकाळात रूढ केलेले आर्थिक गणित आज तंतोतंत लागू पडते. त्यातून त्यांचा सामाजिक व संवेदनशील दृष्टिकोन तर दिसून येतोच, पण भविष्याचा त्यांनी त्याकाळी घेतलेला आढावाही अधोरेखित होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.  सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ग्रंथालय सप्ताहाअंतर्गत आयोजित अनंत कान्हेरे स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. औरंगाबादकर सभागृहात शुक्रवारी (दि. ८) झालेल्या कार्यक्रमात बोलताना भावे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणात न मिळणारी संधी लक्षात घेऊन त्यांनी मंत्रिमंडळात चर्चा करून महाराष्टÑात ग्रामीण भागात जागोजागी महाविद्यालयांची स्थापना केली. त्याकाळी या महाविद्यालयांचा आर्थिक डोलारा सांभाळण्याचे गणित त्यांनी दूरदृष्टीने मांडले होते. १०० पटसंख्या असलेल्या एखाद्या महाविद्यालयातील केवळ २० आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांकडून फी घेऊन उर्वरित ८० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे असे सूत्र त्यांनी दिले. त्याकाळी ग्रामीण भागातून शिकलेले विद्यार्थी आज जगभर ठिकठिकाणी उत्तम सेवा देत देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत व हीच दादांच्या कार्याला मिळालेली पावती असल्याचे त्यांनी सांगितले.  याप्रसंगी सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, यशवंत हापे, नानासाहेब पाटील, श्रीकांत बेणी, नानासाहेब बोरस्ते, अ‍ॅड. अभिजित बगदे, प्रा. यशवंत पाटील, प्रा. सी. आर. पाटील, संजय करंजकर आदी उपस्थित होते. प्रा. शंकर बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रांत दादांनी केलेले काम विलक्षण होते. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता अफाट होती. अडथळ्यांवर मात करण्याची हातोटी कौतुकास्पद होती. सर्वसामान्यांचे ते कैवारी म्हणूनच अखेरपर्यंत कार्यरत होते. हे गुण आजच्या पिढीत येणे गरजेचे आहे, असेही मधुकर भावे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिकlibraryवाचनालय