शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पाच दिवसांपासून शहरात  वरुणराजाची कृपादृष्टी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:38 IST

पाच दिवसांपासून शहरात पावसाने अचानकपणे विश्रांती घेतली असून शहरात सुर्यदर्शनही होऊ लागले आहे. यामुळे जणू पावसाळा संपला की काय असे भासत आहे. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात जोरदार पावसाची अपेक्षा केली जात असताना अचानकपणे पावसाने उघडीप दिल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे.

नाशिक : पाच दिवसांपासून शहरात पावसाने अचानकपणे विश्रांती घेतली असून शहरात सुर्यदर्शनही होऊ लागले आहे. यामुळे जणू पावसाळा संपला की काय असे भासत आहे. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात जोरदार पावसाची अपेक्षा केली जात असताना अचानकपणे पावसाने उघडीप दिल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे.  मागील वर्षी जुलैच्या उत्तरार्धात पावसाची हजेरी समाधानकारक राहिली होती; मात्र यंदा त्या तुलनेत वरुणराजाने कृपादृष्टी कमी केली. या हंगामात अद्याप गंगापूर धरणातून उच्चांकी ९ हजार क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरी या पावसाळ्यात प्रथमच दुथडी भरुन वाहताना नाशिककरांनी बघितली.  रविवारी (दि.२९) इगतपुरी, दारणा धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात शुन्य मि.मी पावसाची नोंद झाली. तसेच गंगापूर, काश्यपी, गौतमी धरण समुहाच्या क्षेत्रातही पावसाने हजेरी लावल्याची नोंद जलसंपदाविभागाकडे नाही. गंगापूर धरणाचा जलसाठा ४ हजार २७४ दलघफू इतका असून धरण ७५.९१ टक्के भरले आहे. सध्या गंगापूरमधून ६३२ क्युसेस इतका विसर्ग गोदापात्रात होत आहे. तसेच काश्यपी धरणामधील पाण्याची पातळी १ हजार ५६८ दलघफूपर्यंत पोहचली असून धरण ८४.६६ टक्के भरले आहे. तसेच गौतमी धरणाचा जलसाठा १ हजार ३२६ दलघफू इतकी झाली आहे. धरणसाठा ८४.६६ टक्क्यांवर पोहचला आहे. या दोन्ही धरणातून काही प्रमाणात गंगापूर धरणक्षेत्रात पाण्याची आवक सुरू आहे. दारणा धरण८४.८८ टक्के भरले असून भावली १०० टक्के भरले आहे.जुलै महिन्यातील पावसाचा उच्चांकयावर्षी १६ तारखेच्या सकाळी साडेआठ वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठवाजेपर्यंत २४ तासांत ५६ मि.मी इतका पावसाचा उच्चांक हवामान केंद्राकडून नोंदविला गेला. गेल्या वर्षी जुलैच्या पंधरवड्यात १४ तारखेला सकाळी साडेआठवाजेपर्यंत २४ तासांत ७१.६ मि.मी इतका पाऊस झाल्याची नोंद केंद्राकडे आहे. एकूणच या आकडेवारीवरुन यावर्षी जुलै महिन्यातील पर्जन्यमान घसरल्याचे दिसते.खड्डे बुजविण्याबाबत उदासीनतापावसाने उघडीप देऊन पाच दिवस उलटले असले तरी अद्याप महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला शहर व उपनगरांमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मुहूर्त लागलेला नाही. पावसाने उघडीप दिल्याची संधी साधून युध्दपातळीवर चांगल्याप्रकारे मुरूम, कचचा वापर करुन खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस