शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या वेढ्यात जन्मली 'वर्षा'; आपत्कालीन परिस्थिती महिला प्रसुती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 15:47 IST

गावात भयाण काळोख पसरला होता प्रत्येक व्यक्ती आपला जीव मुठीत धरून मिळेल त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी जात होते, अशा भयाण प्रसंगात...

सायखेडा (नाशिक)- गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला , गावात येणारे सर्व रस्ते बंद झाले,प्रत्येक गल्लीत पाणी घुसले, वीज पुरवठा खंडित झाला होता, गावात भयाण काळोख पसरला होता प्रत्येक व्यक्ती आपला जीव मुठीत धरून मिळेल त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी जात होते , गावातील सामाजिक कार्यकर्ते सर्वोत्तपरीने मदत करत होते अशा भयाण प्रसंगात चांदोरी येथे ऊस तोडणी करण्यासाठी आलेल्या गीताच्या पोटात कळा यायला लागल्या. पोटात दुखायला लागले, मंगल कार्यालयात सुरक्षित स्थळी असूनही चहुबाजूनी पाणी आणि शेकडो लोक एकाच ठिकाणी असल्याने मोठी अडचण निर्माण झाली यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर आहेर, माजी सरपंच दत्ता गडाख यांनी तात्काळ तहसीलदार दीपक पाटील आणि प्रांत अर्चना पठारे यांना दुरध्वनी मार्फत कळविले प्रांत अर्चना पठारे तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र पुढची कोणतीही कार्यवाही अथवा गाडी पाण्यातून घेऊन जाण्याची परिस्थिती गीताची नसल्याने आणि सरकारी दवाखान्याला चारही बाजूंनी पुराच्या पाण्याचा वेढा असल्याने नेणार कुठे आणि असा प्रश्न निर्माण झाला गावातील येथील डॉ अर्चना कोरडे यांना तात्काळ पाचारण करण्यात आले  सायंकाळचे आठ वाजता बाहेर धो धो पाऊस कोसळत असतांना गीताने एका गोंडस मुलीला जन्म दिला सदर माहिती जिल्हाधिकारी डॉ सूरज मांढरे यांना दूरध्वनीवरून कळविण्यात आली मुलगी जन्माला आली आणि बाहेर पाऊस पडत आहे, मुलीचे नाव वर्षा ठेव्हावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले यावेळी प्रसंगावधान राखत आपले कसब पणाला लावणारे सागर आहेर आणि दत्ता गडाख यांचे कौतुक केले. पुराचा वेढा, धो धो पाऊस, वीज पुरवठा खंडित, कोणतीही साधन सामुग्री उपलब्द नाही अशा प्रतिकूल परिस्थिती मध्ये सदर प्रसुती करण्यात आली सध्या बाळ व बाळंतीण दोघेही सुखरूप आहे.बाळाचे वजन 3किलो 400 ग्रँम आहे-डॉ अर्चना कोरडे, चांदोरी

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव