संदलनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:08 IST2018-08-27T00:08:11+5:302018-08-27T00:08:49+5:30

सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले जुन्या नाशकातील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या ‘संदल-ए-खास’निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. धार्मिक प्रवचन, नात-ए-रसूलची मैफल असे कार्यक्रम बडी दर्गामध्ये आयोजित करण्यात आले होते.

 Various religious programs on the occasion of sanyal | संदलनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

संदलनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नाशिक : सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले जुन्या नाशकातील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या ‘संदल-ए-खास’निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. धार्मिक प्रवचन, नात-ए-रसूलची मैफल असे कार्यक्रम बडी दर्गामध्ये आयोजित करण्यात आले होते.  आज संध्याकाळी चादर शरीफची मिरवणूक काढण्यात येणार असून, महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात बडी दर्गा येथे हुसेनी बाबा यांचा संदल साजरा केला जातो. यानिमित्त बडी दर्ग्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांची मागील तीन दिवसांपासून बडी दर्गामध्ये दर्शनासाठी गर्दी वाढली आहे. संदलनिमित्त महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

Web Title:  Various religious programs on the occasion of sanyal