योगदिनी जिल्ह्यात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 23:58 IST2018-06-21T23:58:08+5:302018-06-21T23:58:08+5:30

नाशिक : जागतिक योगदिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम संपन्न झाले. यानिमित्त विद्यार्थ्यांनी वेगवेगळी योगासने केली.

Various programs in Yaddini district | योगदिनी जिल्ह्यात विविध कार्यक्रम

योगदिनी जिल्ह्यात विविध कार्यक्रम

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी वेगवेगळी योगासने केली.

नाशिक : जागतिक योगदिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम संपन्न झाले. यानिमित्त विद्यार्थ्यांनी वेगवेगळी योगासने केली.
ओझरटाऊनशिप : ओझर शिक्षण संकुल आणि सात महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस ओझर महाविद्यालयात संपन्न झाला. महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्स, एचएएल हायस्कूल व नवीन इंग्रजी शाळा ओझरचे एनसीसी कॅडेट्स यांनी आज सकाळी सामुदायिकरीत्या योगासनांचे सादरीकरण केले. १ जून ते २१ जून-दरम्यान महाविद्यालयात योगासनांचे सराव शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग आॅफिसर कर्नल उपेंद्र कुशवाह, लेफ्ट कर्नल अतिशय शिंदे, प्राचार्य संभाजी पाटील, एचएएल हायस्कूल व प्राचार्य के.एन. पाटील, नवीन इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापक ज्योती कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी प्राचार्य संभाजी पाटील, डॉ. डी. एस. गोडगे, ज्योती कुलकर्णी, के. एन. पाटील, किशोर कचवे, सचिन हरिश्चंद्रे, सुभेदार पवनकुमार, हवालदार पांडुरंग डोईफोडे, योगगुरु दीपक सौदागर, मुस्कान अत्तार यांच्यासह प्राध्यापकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Various programs in Yaddini district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogaयोग