मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम
By Admin | Updated: December 26, 2014 00:13 IST2014-12-26T00:13:45+5:302014-12-26T00:13:57+5:30
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमतच्या बिझनेस आयकॉन्स आॅफ नाशिक या काफी टेबल बुकच्या प्रकाशन समारंभाखेरीज फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईहून सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी मुख्यमंत्री नाशिकच्या पोलीस कवायत मैदानावर हेलीकॉप्टरने येतील. त्यानंतर महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या अधिवेशनानिमित्त आयोजित सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे उद््घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार आहे.
सकाळी ११ वाजता दिंडोरी रोडवरील देवधर इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरात हे अधिवेशन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई असतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता सिडकोतील पवननगर येथील कै. उत्तमराव पाटील क्रीडा संकुलात भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास ते संबोधित करणार आहे.
त्यानंतर दुपारी तीन वाजता नाशिकरोड येथील शिखरेवाडी मैदान येथे अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित फुटबॉल स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि बॅडमिंटन हॉलचे उद््घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहे. (प्रतिनिधी)