शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 18:23 IST

द्वारका येथील वृंदावननगरमध्ये असलेल्या श्री राधा मदनगोपाल मंदिर, इस्कॉन येथे रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संध्याकाळी ६ वाजेपासून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळत आहे

ठळक मुद्देस्वामीनारायण मंदिरातही श्रीकृष्ण जन्म सोमवारी रात्री साजरा केला जाणार आहे. सोमवारी अर्धनारीनटेश्वर रूपात येथील भगवान श्रीकृष्णाचे भाविकांना दर्शन घेता येणार

नाशिक : गोविंदा रे गोपाला..., आज गोकुळात आनंद झाला..., कृष्ण जन्मला गं सखे..., अशा विविध भक्तीपर गीतांनी शहरातील श्रीकृष्ण मंदिरे दुमदुमली. शहर व परिसरात श्रीकृष्ण भक्तांनी कृष्णजन्माष्टमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जात आहे. द्वारका येथील वृंदावननगरमध्ये असलेल्या श्री राधा मदनगोपाल मंदिर, इस्कॉन येथे रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संध्याकाळी ६ वाजेपासून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळत आहे. सकाळी मंगल आरती, महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद् भागवत प्रवचन-कीर्तन पार पडले. नऊ ते रात्री अकरापर्यंत महाभिषेक करण्यात येणार आहे. साडेअकरा ते १२ वाजेपर्यंत महाआरती होऊन श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात येईल. सोमवारी सकाळपासून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा महामहोत्सव इस्कॉन मंदिरात पार पडणार आहे. तसेच मंगळवारी (दि.४) संध्याकाळी सात वाजेपासून रात्रीपर्यंत नंदोत्सव साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीनिमित्त मंदिर पूर्णवेळ भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. ‘हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे..’ ‘हरे राम हरे राम, राम राम हरे हरे...’ चा जयघोषाने मंदिर दुमदुमले होते.

कापड बाजारातील श्री मुरलीधर मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सप्तमी-अष्टमीच्या मुहूर्तावर सकाळी ९ वाजता पवमान अभिषेक करण्यात आला. तसेच रात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी अर्धनारीनटेश्वर रूपात येथील भगवान श्रीकृष्णाचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. बहुतांश लोकांनी श्रीकृष्ण जयंतीनिमित्त रविवारी मध्यरात्रीपर्यंत उपवास केला. पंचवटी कारंजा येथे नवनीत प्रियाजी कृष्ण मंदिरा, केवडीबन येथील जलाराम मंदिरातही श्रीकृष्ण जन्मोत्सव गुजराती भाविकांकडून साजरा केला जाणार आहे. तसेच जुना आडगावनाका येथील स्वामीनारायण मंदिरातही श्रीकृष्ण जन्म सोमवारी रात्री साजरा केला जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकJanmashtami 2018जन्माष्टमी 2018