सटाण्यात शिवजयंतिनिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 14:12 IST2019-02-19T14:11:48+5:302019-02-19T14:12:16+5:30

सटाणा: येथिल नगरपालिकेत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व गुरु रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

Various programs on the occasion of Shiv Jayanti | सटाण्यात शिवजयंतिनिमित्त विविध कार्यक्रम

सटाण्यात शिवजयंतिनिमित्त विविध कार्यक्रम

सटाणा: येथिल नगरपालिकेत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व गुरु रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. येथील नगरपालिकेच्या समोरील शिवतीर्थावर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन नगराध्यक्ष सुनिल मोरे, काँग्रेसचे गटनेते तथा सभापती दिनकर सोनवणे, सभापती निर्मला भदाणे, नगरसेवक राकेश खैरनार, नगरसेविका संगिता देवरे, भारती सुर्यवंशी, सुरेखा बच्छाव, आशा भामरे, सामाजिक कार्यकर्ते नाना मोरकर, दत्तू बैताडे, यांच्या हस्ते पुजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच येथिल पालिकेच्या महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज, गुरू रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन नगराध्यक्ष सुनिल मोरे,नगरसेविका शमा मन्सुरी, पुष्पा सुर्यवंशी, दिनकर सोनवणे, रमेश भामरे,निर्मला भदाणे, पोपट सोनवणे यांच्या करण्यात आले. याप्रसंगी पालिकेच्या सर्व खातेप्रमुखांसह कर्मचारी व वाचक उपस्थित होते.

Web Title: Various programs on the occasion of Shiv Jayanti

टॅग्स :Nashikनाशिक