मालेगावी शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

By Admin | Updated: September 5, 2015 21:45 IST2015-09-05T21:44:03+5:302015-09-05T21:45:16+5:30

मालेगावी शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Various programs on the occasion of the Malegaon Teachers Day | मालेगावी शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

मालेगावी शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

मालेगाव : तालुक्यासह शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांत ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली.
द्याने लो. व्यं. हिरे माध्यमिक विद्यालय
शहरालगतच्या द्याने येथील लो. व्यं. हिरे माध्यमिक विद्यालयात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. सी. डामरे होते. बी. एस. हिरे आदिंची भाषणे झाली. सूत्रसंचालन बी. डी. खैरनार यांनी केले.
जळगाव (नि) गो.य. पाटील विद्यालय
तालुक्यातील जळगाव (नि) येथील गो. य. पाटील विद्यालयात प्रतिमापूजन करण्यात आले. यात प्राचार्य कावेरी ढोणे, पर्यवेक्षक योगिनी गोयेकर यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन शीतल देवरे हिने केले.
खायदे लो. व्यं. हिरे विद्यालय
तालुक्यातील खायदे येथील लो. व्यं. हिरे माध्यमिक विद्यालयात अध्यक्षस्थानी व्ही. एन. कदम होते. मान्यवरांची भाषणे झाली. सूत्रसंचालन मंजुश्री शेलार हिने केले. आभार अमोल पवार यांनी मानले.
वजिरखेडे जनता विद्यालय
तालुक्यातील वजिरखेडे येथील जनता विद्यालयात पायल पठाडे, गौरव पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रियंका बोरसे यांनी केले. कार्यक्रमास गौरव गायकवाड, दीपिका बोरसे, प्रतीक्षा शिवरे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राजक्ता पठाडे यांनी केले. आभार वैष्णवी पाटील यांनी मानले.
मळगाव केबीएच विद्यालय
तालुक्यातील मळगाव येथील के. बी.एच. विद्यालयात अध्यक्षस्थानी विद्यार्थी मुख्याध्यापक विनय खैरनार होते. यावेळी प्रतिमापूजन करण्यात आले. मुख्याध्यापक बी. डी. कासार यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षकाचे काम संकेत कदम यांनी पाहिले. सूत्रसंचालन एम. व्ही. देवरे यांनी केले. आभार एन. के. गायकवाड यांनी मानले.
पाटणे नेहरू विद्यालय
तालुक्यातील पाटणे येथील प.ज. नेहरू विद्यालयात अध्यक्षस्थानी ऐवर्श्या गुंजाळ होते. प्रास्ताविक गायत्री खैरनार यांनी केले. स्नेहल खैरनार, राहुल पगार आदिंच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. मानसी आहिरे, पूजा अहेर, शीतल खैरनार, जान्हवी बागुल यांनी मनोगत व्क्त केले. सूत्रसंचालन पूनम खैरनार यांनी केले. आभार तनुजा निकम यांनी मानले.
कौळाणे (गा) जि. प. शाळा
तालुक्यातील कौळाणे (गा) येथील जिल्हा परिषद शाळेत अविनाश शिंदे व हिलाल शिंदे यांच्याकडून दोन प्रतिमा भेट
देण्यात आल्या. कार्यक्रमास शालेय समितीचे अध्यक्ष पाडुरंग पवार, तुळशीराम पवार, अनिल मोरे, भारत शिंदे, योगेश शिंदे, गंगाधर शिंदे, विजय मोरे व संजय पवार आदि उपस्थित होते.
अध्यापन शिक्षक विद्यालय, कॅम्प
शहरातील कै. भा. हिरे संचलित अध्यापक विद्यालयात अध्यक्षस्थानी रोशनी देवरे होती. प्राचार्य बी. टी. पवार, जे. ए. देसले आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास बी. के. ठाकरे, एस. ई. हिरे, एस. एन. देवरे, आर. आर. भावसार, संतोष वाघ, दामू पाटील, सुरेश वाणी आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिता खैरनार यांनी केले.
आर. बी. एच. कन्या विद्यालय, कॅम्प
शहरातील आर. बी. एच. कन्या विद्यालयात विद्यार्थ्यांनी कामकाज केले. यात मुख्याध्यापिका नेहा मांडवडे, उपमुख्याध्यापिका युगल शेवाळे, पर्यवेक्षिका स्नेहल पवार यांचा समावेश आहे. प्राचार्या एम. आर. हिरे, उपप्राचार्य बी. वाय. पाटील, ए. जे. जोंधळे, आर. जी. पाटील, एल. टी. पाटील, डी. एस. रत्नपारखी, पी. एस. शेवाळे आदि उपस्थित होते.
काबरा विद्यालय, मालेगाव
येथील ल. रा. काबरा विद्यालयात शुभांगी देशमुख मुख्याध्यापिका, निशितोष सरदेसाई व पीयूष सोनवणे यांनी पर्यवेक्षकाची भूमिका बजावली. यावेळी देवकिसन बडाळे, रघुवीर पाटोदिया, भरत तापडिया, ओमप्रकाश सारडा, गोविंद नारायण तोतला आदि प्रमुख पाहुणे होते. सूत्रसंचालन ममता सोनवणे, वैष्णवी शिंदे, रश्मी शिंदे यांनी केले. आभार ए. पी. पाटील यांनी मानले.
वर्धमान शिक्षण संस्था, मालेगाव
येथील वर्धमान शिक्षण
संस्थेच्या र. वी. शाह, वर्धमान उच्च माध्यमिक व कां. रं. शाह विद्यालयात अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र शाह होते. यावेळी सचिव प्रताप शाह, सहसचिव गौतम शाह प्रमुख पाहुणे होते.
जी.डी.ए.बी महाविद्यालय
येथील जी.डी.ए.बी. महाविद्यालयात अध्यक्षस्थानी नजिरी रजी अख्तर होत्या. रा. सी. हाले व डॉ. अरिफ अन्सारी प्रमुख पाहुणे होते. यावेळी रिझवाना हमदानी, जिहार रहमान आदिंसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कर्मवीर या. ना. जाधव विद्यालय
येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एच. एस. वाघ होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकी वेशभूषा सादर केली. प्राचार्य वाघ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पर्यवेक्षक बी. एस. महाले यांच्यासह सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मराठी अध्यापक विद्यालय, कॅम्प
येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. झेड. पाटील होते. आकांक्षा गांगुर्डेने मुख्याध्यापक तर हर्षद बच्छाव यांनी उपमुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहिले. सूत्रसंचालन शुभांगी देशमुख हिने केले. सायली अहिरेने आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्रा. श्रीमती मंगला पाटील, व्ही.डी. सोनवणे, प्रा.व्ही. बी. मगरे, पी. ई. पाटील आदि शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राजीव गांधी इंटरनॅशनल
स्कूल दाभाडी शिवार
येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनीता अहिरे
होत्या. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Various programs on the occasion of the Malegaon Teachers Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.