सिन्नर : लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. रोज नवनवीन सेवा कार्य करुन हा सप्ताह साजरा केला जात असल्याचे लायन्स क्लब ऑफ सिन्नर सीटीच्या अध्यक्ष डॉ. सुजाता लोहारकर यांनी दिली. लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे हे 21 वे वर्ष आहे. या सेवासप्ताहचा शुभारंभ 2 ऑक्टोबर रोजी सिन्नर सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आला. त्याचदिवशी सिन्नरच्या कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी उकडलेले 200 अंडे व 200 सफरचंद डॉक्टरांकडे देण्यात आले. डॉ. निर्मला पवार, डॉ. कानवडे यांच्यासह आरोग्य सेवक यावेळी उपस्थित होते. त्यानंतर लायन्स हॉलमध्ये व रामनगरी गार्डन येथे वृक्षारोपन करण्यात आले. तसेच गरजु व गरीब लोकांना धान्यवाटप करण्यात आले. हेमंत वाजे व सोपान परदेशी यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी अध्यक्षा डॉ. सुजाता लोहारकर, सेक्रेटरी शिल्पा गुजराथी, खजिनदार संगिता कट्यारे, तेजस्विनी वाजे, डॉ. विजय लोहारकर, त्र्यंबक खालकर, डॉ. प्रशांत गाढे, कल्पेश चव्हाण, डॉ. प्रताप पवार, सुरेश कट्यारे, डॉ. धनराज सोनार उपस्थित होते. मनिष गुजराथी यांनी आभार मानले.
लायन्स क्लबच्या सेवा सप्ताहास विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 17:35 IST
सिन्नर:लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. रोज नवनवीन सेवा कार्य करुन हा सप्ताह साजरा केला जात असल्याचे लायन्स क्लब ऑफ सिन्नर सीटीच्या अध्यक्ष डॉ. सुजाता लोहारकर यांनी दिली.
लायन्स क्लबच्या सेवा सप्ताहास विविध कार्यक्रम
ठळक मुद्देरामनगरी गार्डन येथे वृक्षारोपन करण्यात आले.