संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त देवळालीगावात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:15 IST2019-12-29T00:15:30+5:302019-12-29T00:15:51+5:30

देवळालीगाव येथील संताजी महाराज मंडळातर्फे श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

 Various events in Deolaliiga on the occasion of the death of Santaji Maharaj | संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त देवळालीगावात विविध कार्यक्रम

संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त देवळालीगावात विविध कार्यक्रम

नाशिकरोड : देवळालीगाव येथील संताजी महाराज मंडळातर्फे श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
देवळालीगाव महात्मा गांधी पुतळ्यासमोर उभारलेल्या व्यासपीठावर श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यापारी बँकेचे संचालक मनोहर कोरडे, जगदीश पवार, प्रकाश कोरडे, सुखदेव लोंढे, चैतन्य देशमुख, प्रशांत वाघ, मंडळाचे अध्यक्ष पवन शिरसाठ, कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार उपस्थित होते. त्यानंतर देवळाली गाव परिसरातून संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर तेलीगल्लीतील संताजी महाराज मंगल कार्यालयात समाजबांधवांचा सत्कार व विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी योगेश कर्डिले, बाळासाहेब व्यवहारे, संदीप व्यवहारे, अनिल व्यवहारे, शरद कोरडे, गोरख व्यवहारे, दीपक जाधव, गणेश व्यवहारे, कैलास मोरे, राहुल वालझाडे, योगेश व्यवहारे, अविनाश व्यवहारे, संजय व्यवहारे, संजय आंंबेकर, नाना कोरडे, राजेंद्र
व्यवहारे, विजय व्यवहारे, संतोष व्यवहारे, पप्पू कोरडे, सागर
कोरडे, विजय मोरे, गोरख व्यवहारे, अमोल व्यवहारे, विलास राऊत, कमळाकर रत्नपारखी, सोमनाथ काजळे आदींंसह समाजबांधव उपस्थित होते.

Web Title:  Various events in Deolaliiga on the occasion of the death of Santaji Maharaj