सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:31 IST2018-05-20T00:31:41+5:302018-05-20T00:31:41+5:30

विविध विमा कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांच्या विविध मागण्यांसाठी विमा कंपन्यातील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाºयांची बैठक संपन्न झाली.

Various demands for retired employees | सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

नाशिक : विविध विमा कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांच्या विविध मागण्यांसाठी विमा कंपन्यातील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाºयांची बैठक संपन्न झाली.  युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विभागीय कार्यालयात या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ विभागीय अधिकारी दि. मा. गबाळे होते.  यावेळी आॅल इंडिया जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशनचे महासचिव बाबू बनर्जी यांनी सांगितले की, विविध विमा कंपन्यांमधील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांचे निवृत्तिवेतन वाढवून मिळावे, केंद्र सरकार कर्मचारी यांच्याप्रमाणे महागाई भत्ता देण्यात यावा, वैद्यकीय सुविधा त्वरित मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. यावेळी जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशन, नॅशनल इन्शुरन्स ओरिएन्टल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया आदी विमा कंपन्यांचे कर्मचारी उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या काही अडचणी असतील, त्या संदर्भात नाशिकमधील विमा कंपन्यातील सेवानिवृत्त कर्मचाºयांची स्वतंत्रपणे समिती स्थापन करण्यात आली आहे. यात कृष्णा गोंधळेकर, चिंतामणी दातार, सतीश शेंडे आदींचा समावेश आहे.

Web Title: Various demands for retired employees

टॅग्स :Nashikनाशिक