विविध स्पर्धा : जिल्हा क्रीडा कार्यालय क्रीडा व युवा महोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:54 IST2017-11-17T00:54:11+5:302017-11-17T00:54:43+5:30

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक यांच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Various Competitions: Start of District Sports Office Sports and Youth Festival | विविध स्पर्धा : जिल्हा क्रीडा कार्यालय क्रीडा व युवा महोत्सवाला प्रारंभ

विविध स्पर्धा : जिल्हा क्रीडा कार्यालय क्रीडा व युवा महोत्सवाला प्रारंभ

ठळक मुद्देयुवा महोत्सवात भरत नाट्यमशुक्रवारी (दि.१७) महोत्सवाचा समारोप

पंचवटी : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक यांच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित पलुस्कर सभागृहात गुरुवारी (दि.१६) युवा महोत्सवाचे संगीत विशारद प्रशांत महाबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी वास्तुविशारद नरेंद्र टोंगळे होते. व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्र ीडा अधिकारी दिलीप खिल्लारे आदींसह मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध महाविद्यालये तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वयोगट (१५ ते २९) स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात भरत नाट्यम, कथ्थक, लोकनृत्य, तबलावादन, बासरीवादन, वक्तृत्व, लोकगीत, आदींसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे परीक्षक म्हणून कैलास गुरव, नितीन पवार, कीर्ती भवाळकर, सोनाली करंदीकर, राहुल गांगुर्डे यांनी काम बघितले. धात्रक यांनी प्रास्ताविक केले, तर मनोहर जगताप, आर. पी. इंगळे यांनी आभार मानले. शुक्रवारी (दि.१७) या युवा महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.

Web Title: Various Competitions: Start of District Sports Office Sports and Youth Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.