केंद्र सरकारची सात वर्षेपुर्णकळवणला विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:48 IST2021-05-30T21:15:18+5:302021-05-31T00:48:19+5:30
कळवण : केंद्रातील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने ७ वर्ष पुर्ण केल्याबद्दल कळवण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.

कळवण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना मास्कचे वाटप करतांना केदा आहेर, दीपक खैरनार, विकास देशमुख, नंदकुमार खैरनार निंबा पगार आदी.
कळवण : केंद्रातील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने ७ वर्ष पुर्ण केल्याबद्दल कळवण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.
कळवण उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळं व मास्कचे वाटप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचे हस्ते करण्यात आले.
गणेशनगर परीसरातील बेघरवस्तीमधील नागरिकांना मास्क व शिधावाटप तसेच ह्यसेवा ही संघटनह्ण अंतर्गत लसीकरण जनजागृती करण्यात आली.
यावेळी कोरोना काळात रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना कोरोना योध्दा मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी दिपक खैरनार, नंदकुमार खैरनार, विकास देशमुख, डॉ.अनिल महाजन, निंबा पगार, गोविंद कोठावदे, एस. के.पगार, विश्वास पाटील, सचिन सोनवणे, दिपक वेढणे, नामदेव निकम, हितेंद्र पगार, संदीप अमृतकार आदिसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.