सटाण्यात वाजपेयी यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:01 IST2020-12-25T17:01:01+5:302020-12-25T17:01:49+5:30
सटाणा : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती शहरातील आमदार संपर्क कार्यालयात शुक्रवारी (दि.२५)उत्साहात साजरी करण्यात आली. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते दिवंगत वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सटाण्यात वाजपेयी यांची जयंती साजरी
यावेळी बोरसे यांनी वाजपेयी पंतप्रधान असताना घेतलेल्या लोककल्याणकारी योजनांचा ऊहापोह करून अभिवादन केले. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा यांनीही वाजपेयी यांना अभिवादन केले. याप्रसंगी सुधाकर पाटील, मोठाभाऊ सोनवणे, दिलीप सोनवणे, गणेश पाटील, अनिल सोनवणे, प्रवीण बधान आदी उपस्थित होते. दरम्यान वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त तरसाळी येथे आमदार बोरसे यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.