पंचवटी : वेद हे अपौरुषीय आहेत. वेदांचे अध्ययन आणि अध्यापन करण्याबरोबरच वैदिकांनी आपले आचरण शुद्ध ठेवून लोककल्याणासाठी सक्रिय व्हावे, असे प्रतिपादन कर्नाटकस्थित दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदापीठ येथील जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामी यांनी केले.काळाराम मंदिर येथील उपवन इमारतीत महर्षि गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने चारही वेदांचे युवा वैदिक विद्वानांचा शंकराचार्यांच्या हस्ते ब्रह्मरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.वेदपाठशाळेला १ लाखमहर्षि वेद विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असेले वेद अध्ययानाचे कार्य व्यापक झाले पाहिजे तसेच गुरू शिष्य परंपरा पुढे गेली पाहिजे अशी अपेक्षा शंकराचार्यांनी व्यक्त केली व वेद प्रसाराला पाठबळ देण्यासाठी शृंगेरी पीठाच्या माध्यमातून एक रूपयांचे अनुदान देण्यात आले.
लोककल्याणासाठी वैदिकांनी सक्रिय रहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:32 IST
वेद हे अपौरुषीय आहेत. वेदांचे अध्ययन आणि अध्यापन करण्याबरोबरच वैदिकांनी आपले आचरण शुद्ध ठेवून लोककल्याणासाठी सक्रिय व्हावे, असे प्रतिपादन कर्नाटकस्थित दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदापीठ येथील जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामी यांनी केले.
लोककल्याणासाठी वैदिकांनी सक्रिय रहावे
ठळक मुद्देशंकराचार्य भारती : ब्रह्मरत्न पुरस्काराचे वितरण