वडनेरभैरवला मटका अड्ड्यावर छापा चौघावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:36 IST2019-09-05T22:36:30+5:302019-09-05T22:36:43+5:30
चांदवड : तालुक्यातील वडनेरभैरव येथे बेकायदेशीर मटका अड्ड्यावर मालेगाव येथील विशेष पोलीस पथकाने छापा टाकून सुमारे एक लाख पाच हजार सातशे रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. तर तीन जणांना ताब्यात घेतले आहे व एक जण फरार आहे.

वडनेरभैरवला मटका अड्ड्यावर छापा चौघावर गुन्हा दाखल
चांदवड : तालुक्यातील वडनेरभैरव येथे बेकायदेशीर मटका अड्ड्यावर मालेगाव येथील विशेष पोलीस पथकाने छापा टाकून सुमारे एक लाख पाच हजार सातशे रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. तर तीन जणांना ताब्यात घेतले आहे व एक जण फरार आहे.
मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकातील कल्पेशकुमार चव्हाण, अभिजित साबळे, दिनेश शेरावते, मिलिंद पवार यांनी दिनांक ०५/०९/२०१९ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास मिळालेल्या बातमीनुसार केलेल्या छापा कारवाईत वडनेरभैरव पोलिस ठाणे हद्दीत भैरव शिवारातील गावठाण येथे लक्ष्मण चारोसे यांच्या पेरूच्या शेतात मोकळ्या जागी संतोष कारभारी महिले वय ३५, रा. भयाळे, ता. चांदवड (मटका लिहीणार), उत्तम शंकर पवार वय-२९, रा. वडनेरभैरव, तालुका चांदवड (मटका खेळणार) अशोक पातीलबा जगताप वय ४८, रा. खडकजांब, ता. चांदवड, नागेश लक्ष्मण जंगम रा. वडनेरभैरव, ता. चांदवड (फरार मटका मालक)
असे बेकायदेशीर अवैधरीत्या स्वत:च्या फायद्यासाठी कल्याण नावाच्या मटका जुगारावर लोकांकडून अंक आकडे पैसे लावून घेऊन खेळताना व खेळविताना रोख रक्कम २२७००/- रुपये, ३ मोबाइल, १३०००/- रुपये व ३ दुचाकी मोटार
सायकल ७००००/- रु पये असा एकूण १ लाख ५ हजार ७००/- रुपये किंमतीच्या मटका जुगाराच्या साहित्यासह मिळून आले आहेत. म्हणून त्यांच्याविरुद्ध वडनेरभैरव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.