वडनेरभैरवला दरोड्याचा प्रयत्न फसला; एक जखमी

By Admin | Updated: August 29, 2015 00:10 IST2015-08-29T00:09:26+5:302015-08-29T00:10:01+5:30

वडनेरभैरवला दरोड्याचा प्रयत्न फसला; एक जखमी

Vadnarabarrao Draft attempt was unsuccessful; One injured | वडनेरभैरवला दरोड्याचा प्रयत्न फसला; एक जखमी

वडनेरभैरवला दरोड्याचा प्रयत्न फसला; एक जखमी

वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथील धोंडगव्हाण रस्त्यालगत गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माजी सरपंच राजाभाऊ भालेराव यांच्या वस्तीवर त्यांचे चुलते भाऊसाहेब दादा भालेराव (७०) हे पहाटे ४.३० वाजता जागे होऊन घराबाहेर पडले व घरापासून अगदी जवळ जात नाही तोच अचानक तीन पुरुष व दोन महिला अशा पाच ते सहा जणाच्या टोळीने भाऊसाहेब दादा भालेराव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पहिल्या मारात त्यांनी आवाज दिला. तरी टोळक्यांनी त्यांना मारहाण चालूच ठेवली. आवाजाने घरातील महिलांनी बॅटरीच्या साहायाने प्रकाशात घराबाहेर पडताना पाहताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. भाऊसाहेब भालेराव हे मारामुळे निपचित पडल्याने घरातील माणसांनी त्यांना घरात आणले. या वेळेत चोरटे फरार झाले. भाऊसाहेब भालेराव यांचे पोटाचे दोन महिन्यांपूर्वीच आॅपरेशन झाले असल्याने त्याच्यावर खासगी डॉक्टरांकडून त्वरित उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती आसपासच्या वस्त्यांवरच्या नागरिकांना समजताच सर्व जमाव तेथे जमा झाला होता. वडनेरभैरव पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक चंदन इमले हे घटनास्थळी आले. घटनेची माहिती घेऊन त्यांना तपासासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
सदर घटना घडली तेव्हा वाड्या-वस्त्यांवर सिंगल फेज नसल्याने हे चोरटे सापडू शकले नाही. सिंगल फेज सुरू राहिला असता तर लाइटच्या प्रकाशात घटनेला आळा बसू शकला असता. या घटनेने सर्व वाड्या-वस्त्यांवर भीतीचे वातावरण पसरले असून, वीज वितरण कंपनीने भारनियमनाव्यतिरिक्त सिंंगल फेज तरी २४ तास उपलब्ध ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Vadnarabarrao Draft attempt was unsuccessful; One injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.