इंदिरा गांधी रुग्णालयवगळता सर्व केंद्रांवर लसीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:31+5:302021-05-05T04:24:31+5:30

इंदिरा गांधी रुग्णालयात केवळ नोंदणी केलेल्या १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना उपलब्ध साठ्यानुसार लस देण्यात आली. पंचवटीत महापालिकेच्या इंदिरा ...

Vaccination halted at all centers except Indira Gandhi Hospital | इंदिरा गांधी रुग्णालयवगळता सर्व केंद्रांवर लसीकरण ठप्प

इंदिरा गांधी रुग्णालयवगळता सर्व केंद्रांवर लसीकरण ठप्प

इंदिरा गांधी रुग्णालयात केवळ नोंदणी केलेल्या १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना उपलब्ध साठ्यानुसार लस देण्यात आली.

पंचवटीत महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, दिंडोरी रोडवर असलेले मायको रुग्णालय, हिरावाडी कालिकानगर मनपाचे उपआरोग्य केंद्र, मखमलाबाद, तसेच रेडक्रॉस आदी ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना कोरोना पार्श्वभूमीवर कोवॅक्सिन तसेच कोविशिल्ड लस दिली जात आहे. लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर प्रचंड रांगा लागत

असल्याने रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून नागरिकांत शाब्दिक वाद होतात.

मंगळवारी सकाळी महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात लस शिल्लक होती, तर अन्य केंद्रांवर लस शिल्लक नव्हती. त्यामुळे इंदिरा गांधी रुग्णालय वगळता वेगवेगळ्या लसीकरण

केंद्रात लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना लस न घेताच माघारी फिरावे लागले. बुधवारी सकाळी लस येण्याची शक्यता असून, लस उपलब्ध झाल्यास लसीकरण मोहीम पुन्हा सुरळीत होईल, असे मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Vaccination halted at all centers except Indira Gandhi Hospital