धुळवड परिसरात लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:12 IST2021-06-02T04:12:05+5:302021-06-02T04:12:05+5:30

------------------- बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत नांदूरशिंगोटे : मान्सूनपूर्व पावसाने काही भागात हजेरी लावली आहे. मात्र नांदूरशिंगोटे येथे व परिसरात पावसाने ...

Vaccination in Dhulwad area | धुळवड परिसरात लसीकरण

धुळवड परिसरात लसीकरण

-------------------

बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत

नांदूरशिंगोटे : मान्सूनपूर्व पावसाने काही भागात हजेरी लावली आहे. मात्र नांदूरशिंगोटे येथे व परिसरात पावसाने हजेरी न लावल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने नांदूरशिंगोटे भागाला हुलकावणी दिली होती. शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपली आहेत.

-------------------------

मानोरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

नांदूरशिंगोटे : नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावर मानोरी फाट्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. चार किलोमीटर अंतरावर जागोजागी खड्डे असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते. रस्तावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकदा अपघात होतात. संबंधित विभागाने रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.

----------------------

नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

नांदूरशिंगोटे : परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. सुमारे दोन महिन्यापूर्वी ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस देण्यात आलेला आहे. दुसऱ्या डोसचे अंतर दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

Web Title: Vaccination in Dhulwad area