कोटमगाव खुर्द येथे लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 16:54 IST2021-07-14T16:53:53+5:302021-07-14T16:54:35+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द येथे ग्रामपंचायत व जगदंबा माता देवस्थान ट्रस्ट तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंदरसुल यांच्या सहकार्याने कोविड लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कोटमगाव खुर्द कोविड लसीकरणाचे उदघाटन करताना प्रविण गायकवाड आदी.
मानोरी : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द येथे ग्रामपंचायत व जगदंबा माता देवस्थान ट्रस्ट तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंदरसुल यांच्या सहकार्याने कोविड लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड, जगदंबा माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे, प्रा. नानासाहेब लहरे, सरपंच संध्या कोटमे, ग्रामसेवक गणेश रोकडे, सदस्य गणेश कोटमे, अशोक लहरे, दिलीप घोडेराव, प्रवीण लहरे, डॉ. स्वाती करचे, डॉ. अजिंक्य गिरी, आरोग्यसेविका संगीता हिरवे, डॉ. ईश्वर पाडवी, आशासेविका सुरेखा जाधव, भारत मगर, रोहित मढवई, आप्पासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.