सिडकोत एकाच केंद्रावरच १८ वयोगटाला लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST2021-06-23T04:11:11+5:302021-06-23T04:11:11+5:30
गेले काही दिवसांपासून नाशिक शहरासह सिडको व अंबड भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संकेत झपाट्याने घट झाल्याचे दिसून येत आहे. ...

सिडकोत एकाच केंद्रावरच १८ वयोगटाला लस
गेले काही दिवसांपासून नाशिक शहरासह सिडको व अंबड भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संकेत झपाट्याने घट झाल्याचे दिसून येत आहे. यातच महापालिकेत आता सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी लस उपलब्ध करून दिल्याने सिडको व अंबड भागातील लसीकरण लस घेण्यासाठी नागरिकांचा उत्साह दिसून येत आहे. मनपाच्या त्रिमूर्ती चौक, हेडगेवार येथील केंद्रावर ज्या नागरिकांनी लस घेण्यासाठी नोंदणी केली आहे अशा नागरिकांसाठी तसेच वयोवृद्ध ,अपंग, मतिमंद असलेल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नोंदणी न केलेल्या नागरिकांचे लसीकरण केंद्रावर नोंदणी करून लगेचच त्यांना लस दिली जात आहे, तर जुने सिडको येथील केंद्रावर कोव्हॅक्सिन या लसीचा डोस देण्यात येत आहे.
कोट===
लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी हेडगेवार चौक येथील मनपाच्या केंद्रात कोरोना अँटिजन टेस्ट करण्यात आली. निगेटिव्ह अहवाल आल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी लस दिली. कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. ताबडतोब लसीकरण झाल्याने रांगेत उभे राहण्याची वेळ आली नाही.
-चित्रा बिरारी, ज्येष्ठ महिला नागरिक सिडको हेडगेवार चौक
कोट===
त्रिमूर्ती चौक येथील मनपाच्या लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु सर्वांनी रांगेत उभे राहून शांततेत लस देण्यात आली. लस घेण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांची प्रथम कोरोना अँटिजन टेस्ट केली जाते,यानंतर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना लस दिली जाते .
-डॉ. हेमलता देशमुख, वैद्यकीय अधिकारी, त्रिमूर्ती चौक, सिडको
(फोटो २२ लस) : मनपाच्या त्रिमूर्ती चौक, हेडगेवारनगर येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावलेल्या.