मालेगावी परतल्या पर्वणीच्या रिकाम्या बसेस
By Admin | Updated: August 29, 2015 22:43 IST2015-08-29T22:42:34+5:302015-08-29T22:43:26+5:30
मालेगावी परतल्या पर्वणीच्या रिकाम्या बसेस

मालेगावी परतल्या पर्वणीच्या रिकाम्या बसेस
मालेगाव : नाशिक येथे होणार्या कुंभमेळ्याच्या शाहीस्नानासाठी गेलेल्या बसेस रिकाम्या परतण्याची वेळ आली. त्यामुळे महामंडळाचे मोठे नुकसान झाले.
नाशिक व त्र्यंबक येथे कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही- स्नानासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता परिवहन महामंडळाने राज्यभरातून बसेसची व्यवस्था केली होती. यात प्रवासी नाशिकला सोडल्यानंतर या बस रिकाम्याच आणाव्या लागल्यामुळे महामंडळाचे नुकसान झाले. या बस प्रवाशांना सोडल्यानंतर परत माघारी पाठविण्याचे नियोजन न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी एक ते दीड तासानंतर भाविकांची संख्या लक्षात घेऊन बसचे नियोजन करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी काही बस प्रवासी भरल्यानंतर पाठविण्याचे नियोजन करणे आवश्यक होते तर नाशिककडे जाणार्या बसेसची संख्या घटविण्याची आवश्यकता होती. या बस रिकाम्या परत येत असताना येथील बसस्थानकात गर्दी नसतानाही दुपारी एकच्या सुमारास स्थानिक डेपोच्या तीन बस एकाचवेळी नाशिकसाठी फलाटावर लावण्यात आल्या होत्या हे विशेष.