चांदोरी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वासरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 16:45 IST2018-08-17T16:44:46+5:302018-08-17T16:45:00+5:30

चांदोरी: चांदोरी शिवारातील टाकळी फाटा तळेगाव येथील नारायण प्रभाकर शिंदे यांच्या गोठ्या मध्ये बांधलेल्या वासरी वर बिबट्याने दि.१७ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास हल्ला केला.

  Vaasari killed in leopard attack in Chandori area | चांदोरी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वासरी ठार

चांदोरी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वासरी ठार

ठळक मुद्देपिसाळलेले कुत्रे ,बिबट्या यांच्या हल्लयाची समस्या वाढल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.


चांदोरी: चांदोरी शिवारातील टाकळी फाटा तळेगाव येथील नारायण प्रभाकर शिंदे यांच्या गोठ्या मध्ये बांधलेल्या वासरी वर बिबट्याने दि.१७ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात वासरी ठार झाली.
चांदोरी परिसरात बिवट्यांच्या हल्लयात अनेक जनावरांचा बळी जात आहे .पिसाळलेले कुत्रे ,बिबट्या यांच्या हल्लयाची समस्या वाढल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. रात्री च्या वेळेस घरा बाहेर पडणे मुश्किल झाले आहेयात रात्रीच्या वेळात वीज पुरवठा असतो तेव्हा च शेताला पाणी भरावे लागते.
या घटनाकडे वनविभागाने विशेष लक्ष देऊन तळेगाव रस्ता परिसरात पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. (17काऊ)

 

Web Title:   Vaasari killed in leopard attack in Chandori area