शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

उत्तमराव ढिकले यांचे निधन

By admin | Updated: April 8, 2015 01:51 IST

उत्तमराव ढिकले यांचे निधन

नाशिक : राजकारण, सहकार आणि समाजकारणातील अग्रणी आणि नाशिकचे माजी खासदार, आमदार तसेच महापौर अशी अनेक पदे भूषविणारे अ‍ॅड. उत्तमराव नथूजी ढिकले यांचे मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.गेल्या रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरीच असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना कॉलेजरोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला गंभीर असलेली त्यांची प्रकृती काहीशी सुधारल्याचे सांगितले जात होते. तथापि, ही प्रकृतीतील सुधारणा अल्पकाळ टिकली. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेरीस मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. सार्वजनिक जीवनात अखेरपर्यंत सक्रिय असलेल्या ढिकले यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांच्या समर्थकांना धक्का बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच समर्थकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यानंतर पंचवटीतील ‘पार्वती निवास’ या त्यांच्या निवासस्थानी पार्थिव ठेवण्यात आले होते. तेथे त्यांचे समर्थक आणि आप्तेष्टांनी गर्दी केली होती. सर्वच क्षेत्रात वावर असल्याने ढिकले यांच्या निवासस्थानी जमलेल्या सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश वडजे, म्हाडाचे माजी विभागीय संचालक नरेंद्र दराडे, अ‍ॅड. संदीप गुळवे, राजेंद्र डोखळे, परवेज कोकणी, राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद सभापती केदा अहेर, डॉ. प्रदीप पवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी ढिकले यांच्या निवाससस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि श्रद्धांजली अर्पण केली.ढिकले यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मनसेचे शहराध्यक्ष तथा स्थायी समितीचे माजी सभापती अ‍ॅड. राहुल ढिकले, तसेच मविप्रचे चिटणीस व नासाकाचे संचालक डॉ. सुनील ढिकले यांचे ते वडील, तर महापालिकेचे शहर अभियंता सुनील खुने यांचे श्वशुर होते.