ऊसतोड मुकादमाची तळवाडेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 23:57 IST2020-06-28T23:43:19+5:302020-06-28T23:57:24+5:30
तळवाडे येथील ऊसतोड मुकादम गोकूळ खुबा चव्हाण (४८) याचा मृतदेह शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील महालक्ष्मी मंगल कार्यालयातील पत्राशेडमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.

ऊसतोड मुकादमाची तळवाडेत आत्महत्या
नांदगाव : तालुक्यातील तळवाडे येथील ऊसतोड मुकादम गोकूळ खुबा चव्हाण (४८) याचा मृतदेह शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील महालक्ष्मी मंगल कार्यालयातील पत्राशेडमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. मंगल कार्यालयाचे संचालक किरण संपत सोनवणे यांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना दूरध्वनीद्वारे कळविले. घटनेची खबर गोकुळ चव्हाण यांचा भाऊ अंकुश चव्हाण यांनी दिली. याप्रकरणी नांदगांव पोलिसांत अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष मटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. पी. सांगळे, दिपक मुंढे हे करीत आहेत.