विल्होळी उपसरपंचपदी उषाताई पवार यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:43 IST2018-11-27T00:43:36+5:302018-11-27T00:43:53+5:30
विल्होळी : विल्होळी ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक सभेत सर्वानुमते उषाताई शरद पवार यांची विल्होळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ...

विल्होळी उपसरपंचपदी उषाताई पवार यांची निवड
विल्होळी : विल्होळी ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक सभेत सर्वानुमते उषाताई शरद पवार यांची विल्होळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच बाजीराव गायकवाड, ग्रामसेवक बळीराम पगार, ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड, सोमनाथ भावनाथ, संतोष आल्हाट, संपत बोंबले, नवनाथ गाडेकर, मोतीराम भावनाथ, ताराबाई वाघ, सुरक्षा गायकवाड, जानकारीबाई चव्हाण, मंदाबाई थोरात, रेवूबाई आचारी आदींसह गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.