कापूस पणन महासंघ अध्यक्षपदी उषाताई शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:59 IST2017-07-18T23:58:51+5:302017-07-18T23:59:08+5:30
कापूस पणन महासंघ अध्यक्षपदी उषाताई शिंदे

कापूस पणन महासंघ अध्यक्षपदी उषाताई शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या अध्यक्षपदी उषाताई माणिकराव शिंदे यांची अविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदी प्रसेनजीत किसनराव पाटील यांची निवड झाली.
वर्धा रोडवरील पणन महासंघाच्या मुख्य कार्यालयात मंगळवारी ही प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सतीश भोसले यांनी काम पाहिले. पणन महासंघाचे अध्यक्षपद पहिल्यांदाच विदर्भाला सोडून उत्तर महाराष्ट्राच्या झोळीत गेले असून, महिलेला संधी मिळाली आहे. उषाताई या नाशिक जिल्ह्यातील येवला येथील आहेत. येवल्याचे नगराध्यक्षपद तसेच बाजार समितीचे सभापतिपदही त्यांनी भूषविले आहे. महासंघाच्या कामकाजात जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.
येवल्यात जल्लोष
दरम्यान, उषाताई शिंदे यांची निवड झाल्याने येवला शहरात विंचूर चौफुलीवर शिंदे समर्थकांनी आतषबाजी करत आनंद साजरा केला. यावेळी अॅड.शाहूराजे शिंदे, डॉ. संकेत शिंदे, अरविंद शिंदे, निस्सार लिंबुवाले, हारूण शेख, सचिन शिंदे, एकनाथ गायकवाड, सुदाम सोनवणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.