शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

गोदावरी स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांचा तरंगत्या सायकल चा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:22 IST

सायकलच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पट्यांच्या माध्यमातून बॉक्स तयार करून त्यामध्ये रिकामे झाकण बंद पाण्याचे जार बसवून इस्पॅलियर शाळेतील विद्यार्थ्यांनी पाण्यावर तरंगणारी सायकलचा प्रयोग यशस्वी केले आहे.

ठळक मुद्देइस्पॅलियरच्या विद्यार्थ्यांनी बनवली पाण्यावर तरंगणारी सायकलविद्यार्थ्याचा कल्पकतेला संशोधनाची जोड देत अभिनव प्रयोग तरंगत्या सायकलचा गोदावरी नदीच्या प्रदुषण मुक्तीसाठी वापर पानवेली कचरा काढण्यासाठी या तरंगत्या सायकलच्या उपयोग

नाशिक : सायकलच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पट्यांच्या माध्यमातून बॉक्स तयार करून त्यामध्ये रिकामे झाकण बंद पाण्याचे जार बसवून इस्पॅलियर शाळेतील विद्यार्थ्यांनी पाण्यावर तरंगणारी सायकलचा प्रयोग यशस्वी केले आहे.इस्पॅलियर शाळेतील सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी कल्पकतेला संशोधनाची जोड देत तयार केलेल्या या तरंगत्या सायकलचा उपयोग गोदावरी नदीच्या प्रदुषण मुक्तीसाठीही मोठा फायदा होणार आहे. गोदावरीच्या पाण्यावर तयार होणाऱ्या पानवेली काढण्यासाठी या तरंगत्या सायकलच्या पुढील बाजूस विशिष्ठ पद्धतीचे रचनाही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या या संशोधनामुळे जलप्रदुषण कमी करण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ही तरंगती सायकल तयार केली आहे. जगविख्यात शास्त्रज्ञ आर्किमिडीज यांच्या सिद्धांतानुसार जेव्हा वस्तू पाण्यात बुडवतो तेव्हा त्याच्या वजनात घट होते. ज्या वस्तूची घनता कमी असते, तेव्हा ती पाण्यावर तरंगते आणि घनता वाढली तर ती पाण्यात बुडते. वस्तूची घनता आणि घनफळ हे व्यस्त प्रमाणात असते. या सिद्धांताचा अभ्यास करून इस्पॅलियर शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत तरंगती सायकलचा प्रयोग प्रत्यक्षात साकारला आहे. विद्यार्थ्यांनी सायकलचा वापर करत चाकांच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पट्ट्यांचे चौकटी रॅकेट बसविण्यात आले आहे. त्या चौकटीमध्ये झाकण बंद असलेले पाण्याचे आठ रिकामे जार बसविण्यात आले आहे.

हवेचा दाब आणि प्लास्टिकच्या या जारमुळे सायकल पाण्यावर सहजरित्या तरंगते. या पँडलच्या माध्यमातून सायकल पाण्यावर चालवली जाते. या सायकलच्या पुढे लोखंडी पट्टी बसविण्यात आली असून तिला प्लास्टिकचे जाळी बसविण्यात आली आहे. या जाळीच्या माध्यमातून पाण्यात असलेला कचरा, प्लास्टिक, पानवेली, हिरवे गवत असे सर्वकाही सहजरित्या काढता येत असल्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी गोदाघाटवर करून ते यशस्वी केले.

नदीच्या प्रदुषण मुक्तीसाठी विद्यार्थ्यांची ही तरंगती सायकल बहुउपयोगी ठरल्यानंतर विद्यार्थ्यांनी आर्किमिडीज युरेका असा एकच जयघोषही केला. शास्त्र शिक्षिका कल्याणी जोशी, जॅक्सन नाडे, मुख्याध्यापिका अंकिता कुर्या यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

विद्यार्थ्यांची संशोधनातून निर्मितीअभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी संशोधन व कल्पकतेचा योग्य वापर करत ही तरंगती सायकल तयार केली आहे. या सायकलचा वापर करून गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो. याचे प्रात्यक्षिकही गोदाघाटावर करून पाहिले. त्यामुळे या प्रयोगातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू शकेल, अशी प्रतिक्रीया इस्पॅलियर स्कूलचे शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी व्यक्त केले आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाNashikनाशिकStudentविद्यार्थीgodavariगोदावरी