द्राक्षांवर निर्यातीसाठी प्रमाणित औषधांचाच वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:19 AM2019-09-19T00:19:13+5:302019-09-19T00:19:35+5:30

या हंगामात अधिक पाऊस झाल्याने वातावरणात अधिक बाष्पनिर्मिती होऊन डावणी आणि भुरीसह विविध कीटक आणि अळी नियंत्रणाचे आव्हान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

 Use only certified medicines for export to grapes | द्राक्षांवर निर्यातीसाठी प्रमाणित औषधांचाच वापर करा

द्राक्षांवर निर्यातीसाठी प्रमाणित औषधांचाच वापर करा

Next

नाशिक : या हंगामात अधिक पाऊस झाल्याने वातावरणात अधिक बाष्पनिर्मिती होऊन डावणी आणि भुरीसह विविध कीटक आणि अळी नियंत्रणाचे आव्हान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी छाटणीनंतर हंगाम सुरू होण्यापूर्वी जैविक औषधांचा व द्राक्षनिर्यातीसाठी प्रमाणित औषधांचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक असून, विविध प्रकारच्या कीटक नियंत्रणासाठी सापळ्यांचा अधिकाधिक वापर करण्याचा सल्ला राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञांनी द्राक्षबागायतदार शेतकºयांना दिला आहे.
द्राक्ष उत्पादकांना शेती क्षेत्रातील विविध आव्हाने सध्या भेडसावत आहेत. उत्पादन ते विक्री यामध्ये येणाºया समस्यांवर मंथन करण्यासाठी नाशिक विभागीय द्राक्ष बागायतदार संघातर्फे मंगळवारी (दि.१७) दादासाहेब गायकवाड सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन करण्यासाठी द्राक्ष शेती आणि संशोधन केंद्रातील मान्यवरांनी द्राक्ष विक्रीची सद्यस्थिती व भविष्यातील विक्री व्यवस्था, छाटणी ते फळधारणा व थंडीमध्ये द्र्राक्षाच्या आकाराविषयी करावयाच्या उपाययोजना, यशस्वी ग्राफटिंगचे तंत्र, द्राक्षबागेतील नवीन कीड व त्याचे नियंत्रण, द्राक्षबागेतील नवीन बुरशीजन्य रोग व त्यांचे नियंत्रण, जास्त पर्जन्यमानामध्ये द्र्राक्षवेली पोषणावर होणारे परिणाम, संजीवकांचा अतिवापर व त्याचे परिणाम तसेच येणाºया द्राक्ष हंगामाचा आढावा या विषयांवर सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, विजय जाधव, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुवर, डॉ. दीपेंद्र सिंग यादव, डॉ. ए. के. उपाध्याय, डॉ. एस. डी. रामटेके व स्कायमेंटचे हवामान तज्ज्ञ योगेश पाटील याविषयी मार्गदर्शन केले.
द्राक्ष उत्पादक संघाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मानद सचिव अरुण मोरे व कोषाध्यक्ष कैलास भोसले यांच्यासह माजी विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील उपस्थितीत होते.
दरम्यान, द्राक्ष शेतीत उल्लेखनीय काम करणाºया ज्योत्स्ना दौंड, रूपाली बोरगुडे यांच्यासह संघाचे सभासद सुरेश कमानकर व हेमंत पिंगळे यांना राज्य शासनाच्या कृषी विभागाचा कृषिभूषण पुरस्कार मिळल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
समस्या गांभीर्याने घेण्याची गरज
द्राक्ष उत्पादक शेतकºयांसमोर सध्या अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकºयांच्या समस्या गांभीर्याने घेण्याची गरज असून, शेती क्षेत्रातील विविध योजनांचा द्राक्षबागायतदार शेतकºयांनाही लाभ देण्याची गरज असल्याचे मत नाशिक विभागीय द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title:  Use only certified medicines for export to grapes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.