आमदार सानप यांच्या मंडळाकडून डीजेचा वापर, मिरवणुकीत मद्यधुंद कार्यकर्त्यांमध्ये राडा....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 06:16 IST2018-09-24T06:12:04+5:302018-09-24T06:16:22+5:30
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या तपोवन मित्र मंडळाकडून न्यायालयाचा अवमान करीत गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यात आला आहे.

आमदार सानप यांच्या मंडळाकडून डीजेचा वापर, मिरवणुकीत मद्यधुंद कार्यकर्त्यांमध्ये राडा....
नाशिक - भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या तपोवन मित्र मंडळाकडून न्यायालयाचा अवमान करीत गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यात आला आहे.
डीजेच्या तालावर या मिरवणुकीत नाचणारे आमदार पुत्र नगरसेवक मछिंद्र सानप यांच्या काही मद्यधुंद कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याने नाशिकमधील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. मात्र पोलीस व आमदार सानप यांनी असा प्रकार घडला असल्या बाबत इन्कार केला आहे.\