शहरी माओवादाने देशाच्या शांततेला धोका : स्मिता गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:42 IST2018-11-27T00:41:45+5:302018-11-27T00:42:10+5:30
शहरी माओवाद हा आपल्या देशात गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत असून, युद्धनीतीद्वारे अप्रत्यक्षपणे सत्ता ताब्यात मिळविण्याचा प्रकार आहे. त्यामुळे देशाच्या शांततेला मोठा धोका निर्माण झाला असून, याबाबत कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे मत कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी व्यक्त केले.

शहरी माओवादाने देशाच्या शांततेला धोका : स्मिता गायकवाड
नाशिक : शहरी माओवाद हा आपल्या देशात गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत असून, युद्धनीतीद्वारे अप्रत्यक्षपणे सत्ता ताब्यात मिळविण्याचा प्रकार आहे. त्यामुळे देशाच्या शांततेला मोठा धोका निर्माण झाला असून, याबाबत कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे मत कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी व्यक्त केले. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात ‘शहरी माओवादाचे संकट’ या विषयावरील व्याख्यानात गायकवाड म्हणाल्या की, भीमा-कोरेगाव घटना व एल्गार परिषदनंतर शहरी माओवादाचा प्रश्न सर्वांसमोर आला आहे. देशभरात सुरू असलेला नक्षलवाद आणि माओवाद यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. काही दहशतवादी संघटना आणि माओवादी संघटना या शांततेचा भंग करीत आहेत असे त्यांनी सांगितले. इ.स. १९७० पासून शहरी माओवाद अस्तित्वात असून, यामध्ये सुमारे ७५ पेक्षा जास्त संघटना कार्यरत आहेत. या संघटनांच्या राज्यघटना आणि देशातील लोकशाही विरोधी कारवाया सुरू आहेत. याला वेळीच पायबंद घालण्याची आवश्यकता आहे, असेही स्पष्ट मत गायकवाड यांनी व्यक्त केले. याप्रसंगी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संचालक डॉ. मधुकर आचार्य, डॉ. सुरेश हावरे, किरण शेलार, रविराज बावडेकर आदी उपस्थित होते.