स्टारलाइट कंपनीत फलकाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 01:00 IST2019-12-14T00:59:24+5:302019-12-14T01:00:00+5:30
शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेना संघटनेच्या फलकाचे अनावरण गोंदे येथील स्टारलाइट लाइटिंग येथे करण्यात आले.

स्टारलाइट कंपनीतील फलक अनावरणप्रसंगी पदाधिकारी.
घोटी : शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेना संघटनेच्या फलकाचे अनावरण गोंदे येथील स्टारलाइट लाइटिंग येथे करण्यात आले.
कंपनीतील असंघटित आणि ठेकेदारी पद्धतीने काम करणारे कामगार हे युनियनमार्फत योग्य तो न्याय मिळेल या हेतूने संघटनेचे सभासद झाले आहेत. शाखेचे उद्घाटन उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू नागरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा चिटणीस आबा पाटील, योगेश शेलार, सचिन आडोळे, गणेश सोनवणे, पंकज कराडे, श्याम फर्नांडिस, मंगेश ठाकूर, योगेश देशमुख, बाबासाहेब पवार, दीपक भोगे, प्रणव मानकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.