बरडिया यांच्या तैलचित्राचे अनावरण

By Admin | Updated: January 13, 2016 23:58 IST2016-01-13T22:53:07+5:302016-01-13T23:58:40+5:30

मनमाड : पालिका वाचनालयाच्या अभ्यासिकेत कार्यक्रम

Unveiling of Berdi's photo shoot | बरडिया यांच्या तैलचित्राचे अनावरण

बरडिया यांच्या तैलचित्राचे अनावरण

मनमाड : येथील नगरपालिकेच्या इमारतीतील माजी नगराध्यक्ष कै. वर्धमान बरडिया यांच्या तैलचित्राचे अनावरण नगराध्यक्ष मैमुना तांबोळी, डॉ. सी. एच. बागरेचा, सुमतीलाल बरडिया यांच्या हस्ते करण्यात आले.
अनेक विद्यार्थ्यांना शहरात अभ्यासिकेची सोय नसल्याने नाशिक येथे जावे लागते. असंख्य विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे हे परवडणारे नाही, ही बाब लक्षात घेऊन मनमाड बचाव कृती समितीने येथील अभ्यासिकेचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी प्रयत्न केले.
समितीने शहराचा निकोप विकास व वाढीसाठी शहरात कै. वर्धमान बरडिया वाचनालय व अभ्यासिका सुरू करण्याचे हाती घेतलेले काम लाभदायी असल्याचे मत माजी उपनगराध्यक्ष डॉ. सी. एच. बागरेच्या यांनी मनोगतातून व्यक्त केले. बरडिया यांच्या नावाने सुरू केलेली अभ्यासिका जिल्ह्यात नावलौकिकास आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अशोक परदेशी यांनी केले. या चांगल्या उपक्रमासाठी पालिका सर्वतोपरी मदत करेल, असे शिवसेनेचे नगरसेवक संतोष बळीद यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक प्रवीण नाईक, रवींद्र घोडेस्वार, योेगेश पाटील, पोपट बेदमुथा, अनिल चोरडिया, पुष्पा ललवाणी, वैशाली चोरडिया आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मनमाड जनहित संस्था व बचाव समितीचे संतोष बाकलीवाल, भीमराज लोखंडे, राजेंद्र पारीक, उपाली परदेशी, पुंडलिक कचरे, लीला राऊत, मुमताज बेग, रेखा येणारे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Unveiling of Berdi's photo shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.