शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

दापूर परिसरात अवकाळी पावसाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 19:26 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर व दोडी परिसरात रविवारी (दि.२१) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वादळी पाऊस व गारपिटीने पिकांचे ...

ठळक मुद्देगारांचा खच : पिकांचे मोठे नुकसान ; वीज पडून गाय ठार

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर व दोडी परिसरात रविवारी (दि.२१) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वादळी पाऊस व गारपिटीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. सुमारे दीड तास झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाली होती. तसेच पहाटेच्या वेळी गारठा असल्याने समिश्र वातावरणाचा अनुभव परिसरात येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिके काढणीसाठी लगबग सुरु केली होती. दापूर परिसरात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मेघ गर्जना व विजांचा कडकडाटांसह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. सुमारे दीड तास सुरू असलेल्या पावसात गारपिटीने हजेरी लावली. अनेक भागांत शेतातील पिकांमध्ये पाणी साचले होते. रब्बी हंगामातील काढणीस आलेले गहू, हरबरा, ज्वारी, बाजरी, भेंडी, टमाटा, मिरची तसेच कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दापूर भागात वारा व पावसाने गहू व बाजरीचे पिके भुईसपाट झाले आहे.दोडी, दापूर, गोंदे, चापडगाव, शिवाजीनगर, दत्तनगर, खंबाळे आदी भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. दापूर येथील दत्तू आव्हाड, भाऊसाहेब साबळे, बंडू पालवे, दत्तू आव्हाड, संदीप आव्हाड, संपत काटुळे, दत्ता सोनवणे आदींसह अन्य शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.वीज पडून गाय ठारतालुक्यातील गोंदे शिवारात विजांच्या कडकडाट व पावसाने हजेरी लावली. या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. मनेगाव रस्त्यालगत बिरोबा वस्तीकडे राहणारे शेतकरी शंकर कारभारी शिंदे यांनी गोठ्यात बांधलेल्या गायीवर वीज पडल्याने जागेवर तिचा मृत्यू झाला.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दापूर व गोंदे परिसरात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खरीप व रब्बी हंगामातील दोन्ही पिके वाया गेल्याने बळीराजाच्या पदरी पुन्हा निराशाच पडत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांशी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने भरपाई देण्यात यावी.- दत्तात्रय सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, गोंदे.

(२१ दापूर, १, २)

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस