चांदोरीसह गोदाकाठाला अवकाळीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 18:59 IST2021-02-20T18:57:23+5:302021-02-20T18:59:28+5:30
चांदोरी : निफाड तालुक्यातील द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदाकाठ परिसराला अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

चांदोरीसह गोदाकाठाला अवकाळीचा फटका
चांदोरी : निफाड तालुक्यातील द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदाकाठ परिसराला अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षांना पेपरचे आवरण लावले होते, मात्र पावसाने आतील सगळे द्राक्ष घड खराब झाले, इतर स्थानिक दर्जाचे द्राक्ष मण्यांना तडे गेले आहे. यामुळे द्राक्ष पंढरीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
गावातील अनेक हेक्टरवरील गव्हाचे पीक भुईसपाट झाले आहे. यंदा कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली, मात्र आलेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे अनेक पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.