भगूर नगर परिषदेत विषय समिती सदस्यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:13 IST2020-01-24T23:19:06+5:302020-01-25T00:13:30+5:30
भगूर नगर परिषदेतील विविध विषय समिती सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

भगूर नगरपालिकेत विषय समित्यांच्या सदस्यांची यादी तहसीलदार अनिल दौंडे यांना देताना गटनेते विजय करंजकर, अनिता ढगे, आर. डी. साळवे आदी.
भगूर : भगूर नगर परिषदेतील विविध विषय समिती सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
भगूर नगरपालिका सभागृहात तहसीलदार अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. प्रत्येक सदस्यपदासाठी एकेक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी समित्यांच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यामध्ये बांधकाम समितीत संजय शिंदे, विजय करंजकर, भाऊसाहेब गायकवाड, प्रतिभा घुमरे, मनीषा कस्तुरे यांची, तर शिक्षण समिती सदस्यपदी सुदेश वालझाडे, जयश्री देशमुख, संगीता पिंगळे, मोहन करंजकर, फरीद शेख यांची निवड करण्यात आली. आरोग्य समिती सदस्य म्हणून कविता यादव, उत्तम आहेर, स्वाती झुटे, प्रतिभा घुमरे, पंकज कलंत्री यांची, तर पाणीपुरवठा समिती सदस्यपदी दीपक बलकवडे, पंकज कलंत्री, आर. डी. साळवे, फरीद शेख, अश्विनी साळवे यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती सदस्य म्हणून अनिता ढगे, स्वाती झुटे, शकुंतला कुंडारिया, अश्विनी साळवे, मनीषा कस्तुरे यांची निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अनिता करंजकर, मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, रमेश राठोड आदी उपस्थित होते.