वाखारवाडीच्या उपसरपंचपदी निकम बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:52 IST2020-02-12T22:33:50+5:302020-02-12T23:52:48+5:30
देवळा : वाखारवाडी (श्रीरामपूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रत्ना निकम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ...

वाखारवाडीच्या उपसरपंचपदी निकम बिनविरोध
देवळा : वाखारवाडी (श्रीरामपूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रत्ना निकम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक विलास पाटील यांनी घोषित केले. रिक्त उपसरपंचपदासाठी सरपंच दीपक पवार यांच्या उपस्थितीत निवडणूक घेण्यात आली. यावेळी सदस्य कि. वा. निकम, हिरामण निकम, रावसाहेब निकम, योगेश मगर, प्रशांत निकम, रमण निकम, समाधान निकम, दत्तू निकम, पोपट निकम, शंकर निकम, शरद निकम, भरत निकम, बबन निकम, प्रदीप निकम, बंटी निकम आदी उपस्थित होते.