घरफोडीची सातपूर पोलिसांकडून उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:05 IST2018-06-27T23:02:27+5:302018-06-27T23:05:37+5:30
सातपूर : दोन महिन्यांपूर्वी कामगारनगरमध्ये मोबाइल दुकान फोडून घरफोडी करणाऱ्या एका संशयितास सातपूर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून एक लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़

घरफोडीची सातपूर पोलिसांकडून उकल
ठळक मुद्देमोबाइल चोरी ही अभिषेक उद्धव विश्वकर्मा, मंजित मनोज सिंग यांनी केल्याचे समोर आले आहे़
सातपूर : दोन महिन्यांपूर्वी कामगारनगरमध्ये मोबाइल दुकान फोडून घरफोडी करणाऱ्या एका संशयितास सातपूर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून एक लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ कामगारनगर येथील एक्स्परटाईज दुकान १२ एप्रिल रोजी दोन संशयितांनी तोंडाला मास्क लावून फोडले होते़ मोबाइलच्या आयएमआयइ क्रमांकावरून पोलिसांनी शोध घेतला असता चोरीचे मोबाइल विकणारा नीरज राजेंद्र यादव यास पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी या दुकानातील मोबाइल चोरी ही अभिषेक उद्धव विश्वकर्मा, मंजित मनोज सिंग यांनी केल्याचे समोर आले आहे़