कुरुडगावच्या उपसरपंचपदी वर्षा सांगळे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 23:22 IST2019-12-23T23:21:19+5:302019-12-23T23:22:11+5:30

निफाड तालुक्यातील कुरुडगावच्या उपसरपंचपदी वर्षा कुलभूषण सांगळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक सरपंच मारु ती वसंत सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

Unopposed as Vice-Chancellor of Kurudgaon | कुरुडगावच्या उपसरपंचपदी वर्षा सांगळे बिनविरोध

कुरुडगावच्या उपसरपंचपदी वर्षा सांगळे बिनविरोध

निफाड : तालुक्यातील कुरुडगावच्या उपसरपंचपदी वर्षा कुलभूषण सांगळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक सरपंच मारु ती वसंत सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार हेमंत गुरव व त्यांना सहायक म्हणून तलाठी. ए.ए. पठाण होते. उपसरपंचपदाच्या जागेसाठी वर्षा कुलभूषण सांगळे यांचे एकमेव नामनिर्देशपत्र दाखल झाल्याने गुरव यांनी वर्षा सांगळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी शरद शिवराम चकोर, शोभा गौतम कुटे, बाळू रंगनाथ कराटे, अनिता सुनील दराडे, अतुल पुंजाराम ढेंगळे, प्रियंका संतोष डोंगरे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Web Title: Unopposed as Vice-Chancellor of Kurudgaon