एकमताने सदस्यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:23 IST2020-12-31T22:17:43+5:302021-01-01T00:23:00+5:30
सिन्नर तालुक्यातील पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतचा आदर्श पाथरे - पर्यावरणपूरक विकासरत्न तसेच महात्मा गांधी तंटामुक्त विजेता गाव पुरस्कारप्राप्त पाथरे बुद्रुक ग्रामपंचायत एकमताने बिनविरोध करण्यात आली.

पाथरे बुद्रुकच्या ग्रामपंचायतीचे बिनविरोध निवड झालेले सदस्य , कार्यकर्ते आणि ग्रामस्थ. (
सिन्नर तालुक्यातील पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतचा आदर्श पाथरे - पर्यावरणपूरक विकासरत्न तसेच महात्मा गांधी तंटामुक्त विजेता गाव पुरस्कारप्राप्त पाथरे बुद्रुक ग्रामपंचायत एकमताने बिनविरोध करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रणधुमाळी सुरू असून, निवडणुकीत रंगत वाढत आहे. दरम्यान, पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक नऊ जागांसाठी बिनविरोध करण्यात आली. नऊ जागांसाठी बुधवारी ( दि. ३० ) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नऊ जागांसाठी ९ अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले.
संपूर्ण पाथरे बुद्रुक गावाने संघटित होऊन आदर्श निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक काळात त्यात मतभेद, वाद-विवाद, सुडाची भावना, पैसा खर्च होणे आदी प्रकार होत असतो; परंतु ग्रामस्थांनी वेळीच एकत्र येत बिनविरोधचा निर्णय घेतला. कोकाटे पॅनल आणि वाजे पॅनलच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत आदर्श निर्माण करण्याचा हा निर्णय घेतला. यासाठी सर्व पाथरे बुद्रुक ग्रामस्थांनी यासाठी प्रयत्न केले.
बिनविरोध निवड झालेले सदस्य
गणेश रंगनाथ चिने, वाल्मीक दगडू माळी, मनीषा योगेश बिडवे, सुजाता भाऊसाहेब नरोडे, कुसुम राजेंद्र राहटळ, प्रतिभा चंद्रकांत चिने, निकिता संजय थोरात, स्वाती सचिन नरोडे, भारती मच्छिंद्र गीते.