सायगावच्या सरपंचपदी अनिता खैरनार यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:30 IST2021-02-16T20:32:53+5:302021-02-17T00:30:09+5:30
येवला : तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रगती पॅनलच्या अनिता गणपतराव खैरनार तर उपसरपंचपदी गणेश सुकदेव माळी विजयी झाले.

सायगावच्या सरपंचपदी अनिता खैरनार यांची बिनविरोध निवड
ग्रामपंचायत निवडणुकीत ११ जागांपैकी प्रगती पॅनलला आठ जागा मिळाल्या आहेत. प्रतिस्पर्धी तिसर्या आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. तर एक अपक्ष उमेदरवाराने बाजी मारली होती. सरपंच, उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष सभेत विरोधी गटाने गुप्त मतदानाचा आग्रह धरला. त्यामुळे निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली. सरपंचपदासाठी प्रगती पॅनलच्या उमेदवार अनिता खैरनार तर तिसर्या आघाडीच्या वतीने अरविंद उशीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर उपसरपंचपदासाठी तिसर्या आघाडीच्या वतीने भाऊसाहेब अहिरे तर प्रगती पॅनलच्या वतीने गणेश माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. गुप्त मतदान प्रक्रियेत प्रगती पॅनलच्या सरपंच, उपसरपंच यांना प्रत्येकी ८ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी तिसर्या आघाडीच्या उमेदवारांना प्रत्येकी ३ मते मिळाली. निवडणुक निर्णय अधिकारी विलास पाटील यांनी सरपंचपदी खैरनार, उपसरपंचपदी माळी विजयी झाल्याची घोषणा केली. सभेस सदस्य संदीप पुंड, रंजना पठारे, रुपाली उशीर, शालन कुळधर, गणेश माळी, दिपक खैरणार, रेखा जानराव, अरविंद उशीर, भाऊसाहेब आहिरे, योगिता निघुट उपस्थित होते. निवडणुक कामकाजास सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तलाठी मनिषा इगवे व ग्रामसेवक प्रदीप बोडखे, किरण पठारे यांनी सहाय्य केले.
निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलाललाची उधळण करत जल्लोष साजरा केला. ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रगती पॅनलचे नेते गणपतराव खैरनार, अॅड. सुभाष भालेराव, अनिल देशमुख, शांताराम देव्हडे, किरण भालेराव, अशोक कुळधर, विजय खैरनार, शरद लोहकरे, अमोल खैरनार, योगेश दारूंटे, मयुर खैरनार, पोपटराव भालेराव, संभाजी उशीर, कैलास पुंड, अरुण आव्हाड, बाळू साबळे, विक्रम देशमुख, देविदास जानराव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.