शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सौभाग्याचं लेणं झालं असुरक्षित; नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये लाखोंचे सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 15:32 IST

नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच असून, विविध उपनगरीय भागांमध्ये भरदिवसा व संध्याकाळी सोनसाखळी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं हातोहात पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील चार घटनांमध्ये सुमारे दोन लाखांचे सोने चोरट्यांनी पळवून नेल्याने संताप व्यक्त होत आहे.सोनसाखळी चोरीसाठी चोरट्यांनी अशोकामार्गाला लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे या मार्गावर पोलीस ...

ठळक मुद्देपादचारीसह दुचाकीवरील महिलाही ‘टार्गेट’सोनसाखळी चोरीसाठी चोरट्यांनी अशोकामार्गाला लक्ष्य केले

नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच असून, विविध उपनगरीय भागांमध्ये भरदिवसा व संध्याकाळी सोनसाखळी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं हातोहात पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील चार घटनांमध्ये सुमारे दोन लाखांचे सोने चोरट्यांनी पळवून नेल्याने संताप व्यक्त होत आहे.सोनसाखळी चोरीसाठी चोरट्यांनी अशोकामार्गाला लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे या मार्गावर पोलीस चौकी आहे व गस्त पथकाची वाहने सातत्याने या भागात गस्तीवर असतात तरीदेखील सोनसाखळी चोरीच्या घटना दरमहा या परिसरात होत असल्याने संतापाबरोबर आश्चर्य व्यक्त होत आहे. कल्पतरू उद्यानाच्या परिसरात नारायणनगर भागात राहणा-या राजकुमारी देवेंद्रसिंग ठाकूर (३५) या त्यांच्या मुलीसमवेत पायी घराकडे येत असताना चोरट्यांनी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून येत समोरून ठाकूर यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची घटना रात्री साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. ठाकूर यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध ३० हजार रुपये किमतीची सोन्याचे पान असलेली सोनसाखळी लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुस-या घटनेत इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरील घटनेशी साम्य असलेल्या भामट्यांनी दुचाकीवरून येत वासननगर परिसरात मंदा कैलास आहिरे यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची ५० ग्रॅमची सोनसाखळी ओरबाडून पळ काढला. सदर घटना आठ वाजेच्या सुमारास घडली असून, आहिरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तिस-या घटनेत चोरट्यांनी भरदुपारी जेलरोड भागात गंधर्वनगरीत एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील पावणे चार तोळे वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केली. उपनगर पोलिसांत वेरोणिका कदम (६५, रा. डीजीपीनगर १) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. चौथी घटना गोदाकाठावर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. कर्नाटकहून आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरट्यांनी पळ काढला.

पादचारीसह दुचाकीवरील महिलाही ‘टार्गेट’सोनसाखळी चोरट्यांची मजल वाढली आहे. सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाºया महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असताना चोरट्यांनी दुचाकीवरून जाणा-या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीही पळवून नेण्याचे धाडस केल्याचे समोर आले आहे. जेलरोडवरील गंधर्वनगरी परिसरात अ‍ॅक्टीवावरून पतीसमवेत जात असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी अशा पद्धतीने हिसकावून पळ काढला.

टॅग्स :GoldसोनंPoliceपोलिसCrimeगुन्हाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय