वावी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल पेटविल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. पांगरी गावानजीक सिन्नर शिर्र्डी महामार्गावरील जाम नदीवरील पुलाखाली यमाहा कंपनीची वाय झेड ही मोटार सायकल पेटत्या अवस्थेत दिसून आली.यावेळी गावातील ग्रामस्थांनी घटना पाहण्यासाठी गर्दी केली होती. येथील पोलीस पाटील समीक्षा शिंदे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यास खबर देऊन पोलिसांना बोलाविण्यात आले. वावी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे करीत आहे.
पांगरी येथे अज्ञात व्यक्तीने पेटविली दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 19:04 IST