आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा उद्या ऑनलाइन दीक्षांत समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:37 IST2021-02-05T05:37:17+5:302021-02-05T05:37:17+5:30
या समारंभास विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुखदेखील उपस्थित राहणार आहेत, असे ...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा उद्या ऑनलाइन दीक्षांत समारंभ
या समारंभास विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुखदेखील उपस्थित राहणार आहेत, असे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले. विद्यापीठाच्या अधिसभागृहात सकाळी ११ वाजता होणाऱ्या यावेळी विविध अभ्यासक्रमाच्या व आंतरवासीयता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या आठ हजार ६४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना ८५ सुवर्णपदक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व संशोधन पूर्ण केलेल्या तीन विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभाचे https://t.jio/MUHS2021 वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
इन्फो..
यावेळी आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे ५१७, दंत विद्याशाखा पदवीचे एक हजार ९२६, आयुर्वेद विद्याशाखेचे ७२६, युनानी विद्याशाखेचे ८०, होमिओपॅथी विद्याशाखेचे ९४३, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे ५०९, बीपीटीएच विद्याशाखेचे १३४, बीओटीएच विद्याशाखेचे १३, बीए. एसएलपी विद्याशाखेचे ३४, बीपीओ विद्याशाखेचे ३, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेचे ३, पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये एम.डी. मेडिकल विद्याशाखेचे १ हजार ५१, एम.एस. मेडिकल विद्याशाखेचे ६७३, डी.एम. मेडिकल विद्याशाखेचे २४९, एम.सी.एच. मेडिकल विद्याशाखेचे ६७, पी.जी. डिप्लोमा विद्याशाखेचे २६२ आदी याप्रमाणे विद्यार्थ्यांना ऑनलाइन पदवी प्रदान करण्यात येणार आहे.