मालेगावी पोलीस दलातर्फे एकता दौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 00:21 IST2021-11-01T00:21:07+5:302021-11-01T00:21:38+5:30
पोलीस स्मृती सप्ताह व राष्ट्रीय एकता दिनाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून शनिवारी (दि.३१) नाशिक ग्रामीण पोलीस दलामार्फत शहरात एकता दौड काढण्यात आली.

मालेगावी पोलीस दलातर्फे आयोजित एकता दौडमधील विजेत्यांसमवेत राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी आदी.
मालेगाव : पोलीस स्मृती सप्ताह व राष्ट्रीय एकता दिनाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून शनिवारी (दि.३१) नाशिक ग्रामीण पोलीस दलामार्फत शहरात एकता दौड काढण्यात आली.
पोलीस कवायत मैदान येथून निघालेल्या एकता दौडने पाच कि.मी.चा मार्ग पूर्ण केला. कोविड लसीचे दोन डोस घेतलेले १८ वर्षांवरील पुरुष व महिला अशा तीनशे जणांनी एकता दौडमध्ये सहभाग घेतला. याप्रसंगी राज्याचे कृषी व सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, उपविभागीय पोलीस अधिकारी लता दोंदे व पुष्कराज सूर्यवंशी, उपमहापौर नीलेश आहेर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते एकता दौडमध्ये प्रथम आलेल्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.