शेतात अनोखा प्रयोग
By Admin | Updated: March 2, 2017 00:46 IST2017-03-02T00:46:43+5:302017-03-02T00:46:54+5:30
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील युवा शेतकरी महेश उत्तम बोरसे यांनी मिल्चिंग पेपर खरबूज पिकाची लागवड करून त्याच्यावर एक महिनाभर क्रॉप आवरण करून या पिकाचे रोग, कीडपासून रक्षण केले.

शेतात अनोखा प्रयोग
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील युवा शेतकरी महेश उत्तम बोरसे यांनी मिल्चिंग पेपर खरबूज पिकाची लागवड करून त्याच्यावर एक महिनाभर क्रॉप आवरण करून या पिकाचे रोग, कीडपासून रक्षण केले.
अनेक शेतकरी आधुनिक शेती करत वेगवेगळे प्रयोग करतात. पिकापर्यंत खराब हवामान आणि किडी पोहोचणार नाहीत यासाठी विविध पिकांवर क्र ॉप कव्हरचा वापर वाढला आहे. खामखेडा येथील शेतकरी महेश बोरसे यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात लागवड केलेल्या खरबूज पिकावर क्र ॉप कव्हरच्या आवरणाचा प्रयोग केला आहे. साधारणपणे जीएसएम जाडीचे क्र ॉप कव्हर साडेचार ते पाच हजार
रुपयांपर्यंत बाजारात मिळत आहे. सव्वापाच फूट रु ंदी असलेले हे कव्हर आठशे मीटर इतके लांब असते. बोरसे यांनी आपल्या तीन एकर खरबूज पिकात लागवड केलेल्या पिकाला याचे आवरण घातले आहे. या क्र ॉप कव्हरमुळे पिकाचे किडी, मच्छर, मावा, तुडतुडे, थ्रिप्स व रस शोषणाऱ्या किडींपासून संरक्षण होऊन पीक निरोगी राहत आहे. परिणामी दीड महिन्यात फवारण्यावर होणारा खर्च वाचला आहे.
तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान जोपासत आहेत. बोरसे यांनी टरबूज पिकाच्या तीन एकर क्षेत्रावर पंचाहत्तर हजार रु पये किमतीचा क्र ॉप कव्हरचा वापर केला आहे. सध्या शेतीत मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग उतरला असल्याने पारंपरिक शेतीचे चित्र काही अंशी बदलू लागले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब होऊ लागल्याने कमी श्रमात अधिक उत्पन्न मिळू लागल्याने शेतकरीवर्गदेखील या तंत्रज्ञानाचा अवलंब करू लागले आहेत.
महेश बोरसे युवा शेतकरी शिक्षणामुळे शेताच्या उत्पादनात वाढ झाली. ज्ञानामुळे आधुनिक शेतीत विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत वेगवेगळ प्रयोग राबवून शेती केली जात आहे. पिकांची लागवड केल्यानंतर पीक लहान असताना त्यावर विविध रोगाचा प्रादुर्भाव होतो. तेव्हा पीक लागवडीनंतर त्यावर क्र ॉप कव्हर टाकले तर पीक लहान असताना त्यावर या क्र ॉप कव्हरमुळे पिकाचे किडी, मच्छर, मावा, तुडतुडे, थ्रिप्स व रस शोषणाऱ्या किडींपासून
संरक्षण होऊन दीड महिन्यात फवारण्यावर होणाऱ्या खर्च यामुळे वाचणार आहे व उत्पादन क्षमता तिपटीने वाढणार आहे. (वार्ताहर)