अनोळखी महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू

By Admin | Updated: December 8, 2015 23:48 IST2015-12-08T23:47:56+5:302015-12-08T23:48:26+5:30

अनोळखी महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू

Unidentified woman gets trapped under the train and dies | अनोळखी महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू

अनोळखी महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू


इगतपुरी : मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या घोटी गेटजवळील रेल्वे मार्गावर ६ नोव्हेंबर रोजी अंदाजे २५ ते ३० वर्षे वय असलेल्या अनोळखी महिलेचा रेल्वेखाली सापडून जागीच मृत्यू झाला. या महिलेची उंची पाच फूट तीन इंच, रंग गोरा, मजबूत बांधा, लांब काळे केस, अंगात हिरवी काळी लाल प्रिंट असलेली साडी, हिरवा ब्लाऊज, लाल पेटिकोट घातलेला असून, उजव्या हातावर ‘रु कमा’ असे गोंदलेले आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. याविषयी माहिती असल्यास लोहमार्ग पोलीस ठाण्यात संपर्कसाधावा, असे आवाहन श्यामकुमार डोंगरे यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Unidentified woman gets trapped under the train and dies